M.T.S. परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे सुयश……
ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत एमटीएस जळगाव यांच्यातर्फे 2024-25 या सत्रात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवीत अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
वर्ग 2 री तील अद्वैता शिवाजी देशमुख ही राज्यातून 21 वा क्रमांक, निल अनिल लव्हाळे 28 वा, स्पृहा निळकंठ वानरे 23 वी, वर्ग 3 रीचा शिव श्रीकृष्ण धाये 28 वा, आदित्य निलेश गावंडे 28 वा, शाश्वत संतोष हाडोळे 26 वा मिहीर जितेंद्र जोशी 21 वा, कैवल्य चैतन्य कुलकर्णी 18 वा, अनुश्री धीरज पाटील 27 वी, आरुष उमेश वैद्य 24 वा, आर्य राजाराम मैसने 23 वी वर्ग 4 थीची स्वरा सुधीर चव्हाण 14 वी, पार्थ विक्रम घाइट 11 वा, अनुश्री विवेक खपली 13 वी, रियांश मंगेश कुलकर्णी 19 वा, प्रणव स्वप्नील पाटीलखेडे 15 वा, पार्थ गणेश तिहिले 14 वा वर्ग 6 वी ची समृद्धी सुधीर भगत 10 वी, स्वरा प्रफुल्ल भालतिलक 8 वी, श्रेयस विनायक पाठक 6 वा , वर्ग 7 वी चा अथर्व रवींद्र भांबेरे 9 वा व वसुंधरा प्रकाश रेवस्कर 4 थी अशा एकूण 22 विद्यार्थ्यांनी राज्यातून तसेच केंद्रातून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद यांनी केले.
