जिद्द ,शौर्य व आत्मविश्वास यांच्या जोरावर यश संपादन करा : श्री. अविनाश देव
स्थनिक बालशिवाजी शाळेत दि. ४ फेब्रु. रोजी शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव स्मृतिप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीं ,आपले प्रयत्न प्रामाणिक असावेत” असे त्यांनी सांगितले . ५ ते ७ च्या गटातून वर्गवार स्पर्धा घेण्यात आली .
त्यातून उत्कृष्ट बोलणाऱ्या ९ विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीकरिता निवड करण्यात आली. त्यासाठी त्यांना ‘झाडे बोलू लागली तर…’ व मी राष्ट्रध्वज बोलतोय…’ हे विषय देण्यात आले होते. या विषयांवर वेदांती राऊत ,राधा वांबुरकर,अनुष्का चतारे,समृद्धी देशमुख ,मधुरा मल्हार ,अनिकेत पाटखेडकर ,गणेश तायडे ,पूर्वजा ठाकरे, ख़ुशी मोहोड या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले .
या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करण्यात आली . या स्पर्धकांना ‘वीज बंद पडली तर…. ‘ हा विषय वेळेवर देण्यात आला. या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले. त्यामधून ख़ुशी मोहोड हिची उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड करण्यात आली.
परीक्षक म्हणून सौ. मंजिरी कुलकर्णी व अर्चना देशमुख यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव ,मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल , सौ.किर्ती चोपडे ,शाळा समिती सदस्य, पालकवर्ग ,शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. किर्ती खपली यांनी केले.