महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे घवघवीत यश
बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.महाराष्ट्र टॅलेंट सर्च ,जळगाव तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत बारा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
वर्ग २ च्या राजवीर राजेश तारापूरे याने ५ वे;वर्ग ३च्या अंजली अजय कराळे हिने ५ वे,गार्गी आशुआल्हाद भावसार हिने ५ वे,संस्कृती विनायक पाठक हिने ५ वे; वर्ग ४ च्या कांचन राजेश कवडे हिने ९ वे ,भक्ती मनीष मेन हिने ११वे ;वर्ग ६ च्या नमस्वी नारायण शेगोकार हिने २ रे,आदित्य प्रकाश चतरकर याने ५वे,यशराज अरविंद घाटोळ याने ७वे,इशानी उमेश लाहोटे हिने १०वे तर वर्ग ७ च्या अमृता राजेश बाहेकर हिने ४ थे,जान्हवी दिनेश कोळमकर हिने ४थे स्थान प्राप्त केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव ,कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव ,शाळासमिती सदस्य,मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल ,सौ.संगीता जळमकर सौ.कीर्ती चोपडे,सौ. भारती कुलकर्णी ,सर्व शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.