गणेश मूर्ती तयार करण्यासाठीची कार्यशाळा संपन्न

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असण्याऱ्या स्थानिक बाल शिवाजी शाळेत पर्यावरणपूरक शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली . ‘निसर्ग कट्टा ‘ चे सदस्य मा . श्री . संदीप वाघाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली . या कार्यशाळेत वर्ग ६ ते ९ विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.

सर्वप्रथम मा . श्री . संदीप वाघाडकर यांनी ‘पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा’ . हा संदेश दिला व गणेश मूर्ती तयार करण्यास शिकविले . विद्यार्थ्यांनी सुबक व सुंदर गणेश मूर्ती तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले .

सर्व विद्यार्थ्यांनी सुबक गणेश मूर्ती तयार केल्या .तसेच गणपती सजावट पर्यावरणपूरक वस्तूचा कसा वापर करावा हे त्यांनी सांगितले. अलंकार करण्यासाठी झाडाच्या बियांचा उपयोग केला . पिंपळाच्या पानाने सजावट केली , लोकर व बियांपासून सुंदर हार तयार केले . याप्रमाणे गणेश मूर्तीची सजावट करून दाखविली .

यावेळी तयार केलेल्या मातीच्या मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला . याप्रसंगी बाल शिवाजी शाळेच्या मुख्याधापिका सौ .शोभा अग्रवाल , सौ. कीर्ती चोपडे , सौ. भारती कुलकर्णी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते . कार्यशाळा घेणारे मा .श्री . संदीप वाघाडकर यांनी तयार केलेली गणेश मूर्ती शाळेच्या मुख्याधापिकांना भेट दिली .