पर्यावरण पूरक ‘ माझा गणपती ‘ उपक्रम संपन्न
स्थानिक जठारपेठ बाल शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने शाळेत शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन शनिवार 27/ 8/ 22 रोजी करण्यात आले होते. हा उपक्रम शाळेच्या सहशिक्षिका सौ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमात वर्ग ५ ते ७ चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी गणेश मूर्ती सहज व सोप्या पद्धतीने तयार करण्यास शिकवले. विद्यार्थ्यांनी आकर्षक व मनमोहक गणेश मूर्ती तयार करण्याचे कसब आत्मसात केले व सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार सुंदर अशा गणेश मूर्ती तयार केल्या. यावेळी तयार केलेल्या शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना घरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे उपस्थित होत्या. वर्ग ५ ते ७ च्या सर्व शिक्षिकांनी उपक्रम यशस्वी केला.


