वाचन, चिंतन, मनन या त्रिसूत्रीचा अवलंब करून यशस्वी व्हा  – श्री. अविनाश देव

ब्राह्मणसभा संकुल अंतर्गत बाल शिवाजी शाळेत महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांच्या शुभहस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘गर्जा महाराष्ट्र  माझा  ‘ या राज्यगीतातून महाराष्ट्राचा जयजयकार केला. अवनी टोपले हिने आपल्या भाषणातून  महाराष्ट्र निर्मितीची कथा आणि त्यानंतर महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.  तर श्रीहरी राऊत ह्याने कामगार नेते श्री. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याची ओळख आपल्या भाषणातून करून दिली. शाळेतील शिक्षिकांनी ‘ही मायभूमी … ही जन्मभूमी ‘ हे महाराष्ट्राबद्दलचा अभिमान व्यक्त करणारे समूहगीत सादर केले.  आपल्या अध्यक्षीय भाषणातून  संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी ” वाचन, चिंतन, मनन या त्रिसूत्रीचा अवलंब करावा तसेच प्रत्येक काम निष्ठेने करावे.” असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. 

याप्रसंगी होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत रजत पदक प्राप्त केलेल्या संस्कृती विनायक पाठक व मृदुला अविनाश देशमुख यांचा पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. तसेच 

वर्ग ४ थी व ७ वी साठी घेण्यात आलेल्या गणित विषयावरील पायभूत चाचणीत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. वर्ग ४  मधून भावेश गेडाम, शाश्वत नागरे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक तसेच श्रीयश विनायक पाठक, आराध्या सुशील इंगळे, अर्णव विजय धोत्रे या विद्यार्थ्यांनी  द्वितीय क्रमांक प्राप्त केला. वर्ग ७ मधून आयुष गजानन जळमकर याने प्रथम क्रमांक तर श्रीप्रसाद पंकज देशमुख, अदिती शंकर पाटील या विद्यार्थ्यांनी  द्वितीय क्रमांक प्राप्त केला.  याप्रसंगी संस्थेचे 

अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. विश्वनाथ गद्रे, शाळा समिती सदस्य, श्री. नरेन निखाडे, श्री. महेश कोतेगावकर ,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर , बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे,  शिक्षकवृंद,पालकवर्ग व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन  सौ.किर्ती खपली 

व प्रास्ताविक सौ. अंजली शेटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम्  या प्रार्थनेने झाली.

.