राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची वेदश्री गोतमारे हिने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची वेदश्री गोतमारे हिने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. वेदश्रीचे व तिच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन.💐💐💐💐

Read more

बाल शिवाजी शाळेच्या  विद्यार्थीर्नीची टेबल टेनिस मध्ये  विभागीय स्तरावर निवड  ……

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन न्यू इंग्लिश हायस्कूल रामदास पेठ अकोला येथे करण्यात आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत 14 वर्षातील मुलींच्या टीम मध्ये कु. वीरा विजय महाजन, कु. स्वरा निलेश चिमणकार, कु. त्रिष्णा प्रवीण कानकिरड  यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यार्थीनीनी  चांगल्या प्रकारे कामगिरी करून विजय

Read more

बाल शिवाजी स्कूल जठारपेठ अकोला, महाराष्ट्र बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचीराज्यस्तरावर निवड…

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची संलग्न असलेली अकोला महानगर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व प्रभात किड्स  स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 व 21 जुलै 2024 रोजी प्रभात किड्स  स्कूल पातुर रोड अकोला येथे विविध गटातील मुला-मुलींचे राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते, त्या स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व त्यामध्ये वर्ग ४ मधील जान्हवी प्रकाश रेवस्कर हिने

Read more

१७ वर्षा आतील मुलींची टीम विभागीय स्तरावर 

अकोला क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच अकोला जिल्हा महानगर अंतर्गत १७ वर्षातील मुलींची क्रिकेट स्पर्धा अकोला क्रिकेट क्लब अकोला येथे संपन्न झाल्या. त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्थानिक बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता त्या स्पर्धेमध्ये ४ ओव्हरची मॅच ठरवली होती परंतु विरुद्ध बाजूच्या टीम ने प्रथम बॅटिंग करून चार ओव्हर मध्ये ४५ रन केले व त्यांनी

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी प्रगती विनोद आपोतीकर वर्ग 7 वा हिने सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत 14 वर्षातील वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक

अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सिकई मार्शल आर्ट स्पर्धा वसंत देसाई क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी प्रगती विनोद आपोतीकर वर्ग 7 वा हिने 14 वर्षातील वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपली निवड विभागीय स्तराकरता निश्चित केली आहे.  त्यासाठी तिचे संस्थेकडून व शाळेकडून खूप कौतुक. तिला पुढील वाटचालीसाठी खूप

Read more

मारवाडी युवा मंच तर्फे आयोजित सायकलिंग स्पर्धा 

मारवाडी युवा मंच अकोला तर्फे सायकली स्पर्धा दिनांक 27ऑगस्ट  2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा आर. डी. जी. कॉलेजमधून सुरू होऊन अकोल्यामध्ये अशोक वाटिका, सिटी कोतवाली, अकोट स्टॅन्ड, दुर्गा चौक या मार्गे  आर. डी. जी. कॉलेजमध्ये येथे समाप्त झाली. या स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेचे वर्ग ८, ९, १० वी चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.  विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे व शाळेतर्फे कौतुक !! 

Read more

१० वेस्टन झोन रायफल शुटिंग  चॅम्पियन – २०२३

मुंबई येथे झालेल्या १० वेस्टन झोन रायफल शुटिंग चॅम्पियन – २०२३  या स्पर्धेत आपल्या शाळेचा विद्यार्थी चिन्मय चंद्रकांत चव्हाण वर्ग ९ वा याची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली असून केरळ राज्यामध्ये तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या खेळात तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.  पुढील वाटचली करिता संस्थेकडून व शाळेकडून चिन्मयला खूप खूप शुभेच्छा. 

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे  वैयक्तिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुयश 

युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय महानगरपालिका मध्ये समाविष्ट सर्व शाळांनी वैयक्तिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेतला त्यात स्थानिक बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेटलिफ्टिंग स्पर्धेत आपल्या शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भार्गव महेश महाकालीवार याचा प्रथम क्रमांक आला असून त्याची विभागीय स्तरावर निवड झाली. प्रणव संजय तारापुरे याचा द्वितीय क्रमांक आला

Read more

बाल शिवाजी शाळेच्या  विद्यार्थिनींची टेबल टेनिस स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत अकोला जिल्हा महानगर अंतर्गत टेबल टेनिस या सांघिक खेळात जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या श्रावणी इंगळे, श्रेया कांगटे,  सायली इंगळे, ऋजुता घोगरे, वृंदा इंगळे या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन स्पर्धेत येण्याचा प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तसेच त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.    यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांची बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला द्वारा आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन शालेय क्रीडा स्पर्धा  २३/०८/२०२३ रोजी वसंत देसाई स्टेडियम येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील सर्व शाळांनी  सहभाग नोंदविला होता.  यामध्ये स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळा व बाल शिवाजी माध्यमिक शाळेने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत निवड चाचणी घेण्यात आली त्यामध्ये वर्ग ८ वी ची

Read more
1 2