बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून शाळेच्या निकाल १००% लागला आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत बाल शिवाजी शाळेने आपली परंपरा कायम ठेवत ९५ पैकी ८२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी त्यापैकी ५२ विद्यार्थी ९०% च्या वर आहेत.
अमित संजय घाटोळ व यशराज प्रमोद तायडे यांनी सर्वाधिक ९८.२० % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.
तसेच रुपेश विजय ठाकरे व साक्षी रणजित राऊत ९७.६०% गुण मिळवून शाळेत व्दितीय तर आकांक्षा अरुण इंगोले ९७.२० % गुण मिळवून शाळेतून तृतीय आली.संस्कृत विषयात सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण, गणित विषयात १४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० तर समाजशास्त्रात एका विद्यार्थाला १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.
यावर्षीच्या निकालात बाल शिवाजी शाळेतील मुलांनी बाजी मारली.
गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव,सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव,शाळासमिती सदस्य,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल,सौ.कीर्ती चोपडे,उपमुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व सौ. भारती कुळकर्णी व शाळेतील सर्व शिक्षिकांनी केले.
- Amit Ghatol
- Yashraj Tayade
- Rupesh Thakare
- Sakshi Raut
- Akanksha Ingole