सर सी.व्ही.रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत बाल शिवाजीची संस्कृती पाठक महाराष्ट्रात प्रथम

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेची वर्ग सहावीची विद्यार्थिनी कु. संस्कृती विनायक पाठक हिने सी. व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम स्थान पटकावले आहे. परीक्षेत मिळविलेल्या सुयशाबद्दल तिला बक्षीस स्वरूपात रुपये ५०००/ किंमतीचा टेलिस्कोप मिळाला आहे.  या शिवाय होमी भाभा बाल वैज्ञानिक सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत तिने सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. 

तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (जळगांव), Wisdom Maths and Science Exam, भास्कराचार्य परीक्षा यासारख्या विविध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मध्ये संस्कृतीने घवघवीत यश संपादन केले आहे. संस्कृतीने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई  देव, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, सौ. संगीता जळमकर, व सौ. भारती कुळकर्णी, शिक्षक वृंद  व कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.  

कु. संस्कृती विनायक पाठक