बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची झेप

विज्ञान या विषयाचा दैनिक जीवनात उपयोजन करता आले पाहिजे या उद्देशाने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळा तर्फे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.ही स्पर्धा वर्ग ६ आणि वर्ग ९च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असते. या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

ही स्पर्धा  प्राथमिक लेखी स्तर,व्दितीयप्रात्यक्षिक स्तर आणि तृतीय प्रत्यक्ष मुलाखत स्तर अशा तीन टप्प्यात घेण्यात येते. व्दितीय  स्तराच्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता शाळेतील वर्ग ६ च्या सर्वेश अतुल बकाल आणि ज्ञानेश्वरी धनंजय झापे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर वर्ग ९ च्या गौरी संदीप वाघाडकर आणि अमृता राजेश बाहेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेकरिता निवड झालेले विद्यार्थी बजाज सायन्स सेंटर, वर्धा येथे ९ डिसेंबर२०१८ रोजी जाणार आहेत.
या विद्यार्थ्यांची स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे,सौ.शोभा अग्रवाल,सौ.संगिता जळमकर,सौ.भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले असून,पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.