आंतरराष्ट्रीय बाल विज्ञान व गणित उत्सव
विशाखापट्टणम येथे १९ ते २१ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ४ थ्या आंतरराष्ट्रीय बाल विज्ञान आणि गणित उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी यशस्वी सहभाग नोंदविला.
या उत्सवात भारत, थायलंड, मलेशिया, साऊथ आफ्रिका, हाँगकाँग, डेन्मार्क, फिनलँड या देशातील एकूण ३०० विद्यार्थ्यांच्या ९५ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. वर्ग ९ च्या स्नेहा शंकर अरबाळ व समृद्धी ज्ञानेश्वर खडसे या विद्यार्थिनींनी A solution for space pollution हा प्रकल्प सादर केला. निवृत्त वरिष्ठ Nuclear Scientist डॉ. श्री. ए. पी. जयरामन यांना या प्रकल्पाची संकल्पना विशेष आवडली. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात या प्रकल्पावर विशेष कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांना या साठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.
तसेच वर्ग ९ च्या जान्हवी दिनेश कोळमकर या विद्यार्थिनीने trigonometric ratio practical model सादर केले. या मॉडेल मध्ये Laser beam च्या मदतीने complementary angles चे प्रात्यक्षिक करता येते व विद्यार्थ्यांची Trigonometry ची भीती नाहीशी होऊ शकते. विद्यार्थी व शिक्षकांसाठी हे मॉडेल अतिशय उपयुक्त आहे.
या दोन्ही प्रकल्पांसाठी शाळेच्या शिक्षिका सौ.सुनीता कोरडे यांनी योग्य व उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्याही या उत्सवात सहभागी झाल्या होत्या .या उत्सवादरम्यान देश विदेशातून आलेल्या वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची संधी या विद्यार्थिनींना मिळाली.
या यशस्वी सहभागाबद्दल विद्यर्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे,सौ.शोभा अग्रवाल,सौ.संगिता जळमकर,सौ.भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले.