निबंध स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या शिक्षिकांचे सुयश

समाज व्यवस्था निकोप राहण्यासाठी सामाजिक संस्थांच्या खूप मोठा वाटा असतो. अकोल्यातील सुपरिचित सामाजिक संस्था ‘मातृसेवा संघाच्या’ हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत अकोल्यातील बाल शिवाजी शाळेच्या शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. ‘आजची स्त्री आणि पेहराव’ या विषयावर सौ. अश्विनी पांडे यांनी उत्कृष्ट निबंध लिहून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर ‘बदलती जीवनशैली आणि सणवार’ या विषयावर सौ. अनिता वानखेडकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. दि. २८. १०. २०१८ शनिवार रोजी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून अमरावती मातृसेवा संघाच्या संचालिका श्रीमती पाध्ये यांनी स्थान भूषविले. तर पाठक ट्युटोरिअल्स च्या संचालिका सौ. वैजयन्ती पाठक यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले. निबंध स्पर्धेतील यशाबद्दल यशस्वी शिक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे,सौ.शोभा अग्रवाल,सौ.संगिता जळमकर,सौ.भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.