बाल शिवाजी शाळेत महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी
जठारपेठ स्थित ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महामानवांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.सर्वप्रथम शाळेत प्रभातफेरी काढण्यात आली. त्यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. ज्योती कोकाटे यांनीकेले. राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल बहादूर शास्त्री माहिती योगिनी निकम व गार्गी भावसार यांनी सांगितली. ‘सत्यनिष्ठा गांधीजींची ‘ ही गोष्ट निरल निखाडे हिने सांगितली. ‘Simplicity of Sharati’ याबद्दल सक्षम बेदरकर ने आपल्या भाषणातून सांगितले .
दांडी यात्रेचा प्रेरक प्रसंग संस्कृती पाठक हिने कथन केला व विद्यार्थ्यांनी सादर केला.गांधीजींच्या जीवनावर आधारित पोवाडा विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादर केला.कार्यक्रमाचे संचालन गार्गी गाडगीळ हिने केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोला आकाशवाणीचे केंद्र प्रमुख श्री.विजय दळवी सर लाभले होते. ‘आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा’ असाअमूल्य संदेश विद्यार्थ्यांना यावेळी दिला.कार्यक्रमाची सांगता ‘वैष्णव जन ते…… ‘ या भजनाने झाली.
स्व.अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमुख अतिथी श्री.विजय दळवी सर,संस्थेचे सचिव श्री.गद्रे सर यांनी बक्षिसे देऊन कौतुक केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, सौ.शोभा अग्रवाल, सौ. भारती कुळकर्णी. सौ. संगीता जळमकर, शाळा समिती सदस्य, शिक्षक, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.