पवित्र व प्रसन्न वातावरण निर्माण करणारे सामूहिक अथर्वशीर्षचे चतुर्सहस्त्रावर्तन संपन्न
दरवर्षीप्रमाणे गणेशोस्तवानिमित्त ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेच्या पटांगणात मनाला प्रसन्न करणारे अथर्वशीर्षचे चतुर्सहस्त्रावर्तन करण्यात आले. सर्वप्रथम संस्थेचे सचिव मा.श्री. गद्रे सर व शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी गणेश पूजन केले.
सर्व विद्या व कलांचे अधिष्ठान असलेल्या श्री गणेशाने हिंदू संस्कृती व्यापून टाकली आहे. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांची लाडकी देवता असलेल्या या गणेशाचे संत महात्म्यांनी स्तवन केले आहे. अशा या सर्वव्यापी गणेशाला मनोभावे वंदन करून सुबुद्धी, विवेक व सुयशाचे मागणे मागून अथर्वशीर्ष चतुर्सहस्त्रावर्तनाला सुरुवात केली. सुमारे ८०० जणांनी ५ वेळा अथर्वशीर्षचे पठन केले. त्या उद्घोषाने संपूर्ण परिसर पवित्र व प्रसन्न झाला. पठनानंतर श्री. गणेशाची आरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया ‘ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री. गद्रे सर ,शाळा समिती सदस्य श्री.राजेंद्र मेंडकी, श्री. अजित पाटखेडकर, श्री.विजय झापे, श्री.निलेश पाकदुने ,श्री. महेश कोतेगावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल, सौ, कीर्ती चोपडे तसेच उपमुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सौ. भारती कुळकर्णी , शिक्षक वृंद व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.