बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी उत्साहात संपन्न

जठारपेठ परिसरातील बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला.आजच्या काळातील मुलांनी एकीचे बळ वाढवून आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी संगठन करणे खूप आवश्यक आहे असा संदेश प्रमुख अतिथी सौ.भक्ती बिडवई यांनी दिला .
कार्यक्रमाचे संचलन वर्ग ३ री चे विद्यार्थी आयुष जळमकर व वैष्णवी लोहीत यांनी केले. श्रीकृष्णप्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. वल्लरी रेलकर हिने आपल्या स्वगतातून यशोदेची भूमिका विशद केली.तसेच आमच्या काही बालगोपालांनी ‘किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला…’ हे समूहगीत सादर केले.

युगंधर पाकदुने याने “आपल्या शक्तिसामर्थ्याने वृषभासुराचा वध केला” ही श्रीकृष्णाची गोष्ट सांगितली. निस्वार्थी प्रेमाचे महत्व सांगणारी ‘सत्यभामेला मीठ अळणी ‘ ही नाटिका उत्कृष्टपणे सादर केली. सार्थक सोमण, रेणुका गोगरकर, कस्तुरी देशपांडे , सुप्रिया देशमुख, आराध्य जोशी, अनिश भाले, श्रीप्रसाद देशमुख, गौरवी चांदुरकर, आनंदी म्हैसने, वैदेही भारसाकळ, रेवती कुकडे, श्रेया मोटे, श्रेया राहाटे, सोनाक्षी दावेदार या सर्वांनी आपापल्या भुमिका उत्तमरित्या वठवल्या. सर्व गोपगोपींकानी कृष्णासह नृत्य सादर करून दहीहंडी फोडली. नंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे सचिव श्री. गद्रे सर, मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल, सौ. कीर्ती चोपडे, सौ. संगीता जळमकर, सौ. भारती कुळ्कर्णी, पालक वर्ग, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्रीकृष्णाच्या नामाच्या गजराने करण्यात आली.