बाल शिवाजी शाळेत संस्कृत कार्यशाळा संपन्न———
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या बाल शिवाजी शाळेत संस्कृत विषयाची कार्यशाळा घेण्यात आली-या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती संस्कृत
भाषा तज्ज्ञ समितीत असलेल्या व विद्याभारतीच्या कार्यकर्त्या डॉ-प्रज्ञा शरद देशपांडे यांनी शिक्षकांशी संस्कृत कृतिपत्रिका व पाठ्यपुस्तक याबाबत चर्चा करून असलेल्या शंकाचे निरसन
केले-चर्चासत्रानंतर डॉ-प्रज्ञा शरद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधला विद्यार्थ्यांना संस्कृत अध्ययनाविषयी उत्कृष्ठ मार्गदर्शन केले-संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण
मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन व स्वयंअध्ययनाने आपण सहज यश मिळवू शकतो हे समजावून दिले-
यावेळी नागपूर येथील विद्याभारती विदर्भ व देवगिरी प्रांताचे संघटन प्रमुख मा.श्री.शैलेशजी जोशी,विद्याभारती विदर्भ कार्याध्यक्ष श्री.सचिनजी जोशी,प्रांतप्रचार प्रमुख श्री.समीरजी थोडगे यांनी
शाळेला भेट दिली. ब्राह्मणसभा संस्था अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिवश्री.मोहन गद्रे,उपाध्यक्ष श्री.नरेंद्र पाठक,कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव,सौ.वैजयंती पाठक, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र
देशपांडे हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल,सौ.भारती कुळकर्णी व शिक्षिका सौ.स्वाती बापट यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन सौ.रश्मी जोशी यांनी
केले तर आभारप्रदर्शन सौ. किरण मुरूमकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.