बाल वारकरी रंगले विठ्ठल नामाच्या गजरात

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ‘आषाढी एकादशी’निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग पहिलीच्या दोन विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची वेशभूषा केली तर इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषा करून आले होते.

‘जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या गजरात टाळ वाजवत विद्यार्थ्यांनी दिंडी काढली.वर्गावर्गातून ‘आषाढी एकादशीचा’कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी,गोष्टी,अभंग, भारुडे सादर केली.

कार्यक्रमात सर्व शिक्षिका सुद्धा उत्साहाने सहभागी झाल्या व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगितले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल,सौ.कीर्ती चोपडे,सौ.संगीता जळमकर व सौ. भारती कुळकर्णी ह्या उपस्थित होत्या.