बाल शिवाजी माध्यमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न
योगविद्या ही भारताची प्राचीन व वैभवशाली परंपरा आहे. योगविद्येचे उगमस्थानच मुळी भारत देश आहे. पतंजली ऋषींनी फार पूर्वी योगाची सूत्रे लिहून योगसाधनेचे महत्त्व सांगितले. सुदृढ आरोग्य व मनःस्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या ४ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व जगभरात साजरा केला जातो. बलोपासनेचे महत्त्व विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच बिंबवणारा योगदिन जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला योगतज्ज्ञ मा. डॉ. मनीषा नाईक, डॉ. दिशा पंडित, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव उपस्थित होते.
योगतज्ज्ञ मा. डॉ. मनीषा नाईक यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम, ओंकार, विविध योगासने याबाबत शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक योगक्रियेमागील शास्त्रीय कारण, त्याचे शरीराला होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव यांनी योगदिनाबरोबर आजच्या दिवसाचे भौगोलिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. सौ. स्वाती बापट यांनी संस्थेच्या वतीने मा. डॉ. मनीषा नाईक व डॉ. दिशा पंडित यांचे आभार मानले.
या प्रसंगी संस्थेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल यांनी मा. मनीषा नाईक मॅडम यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. या प्रसंगी
उपमुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व सौ. कीर्ती चोपडे,सौ.भारती कुळकर्णी, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.