वक्तृत्वातील सप्त सूर ओळख – प्रा. कल्पना तायडे
स्थानिक बालशिवाजी प्राथमिक शाळेत, शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या ७ फेब्रुवारी या स्मृतिदिना प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष अविनाश देव होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तुळसाबाई कावल महाविद्यालय पातूर, च्या प्राध्यपिका सौ. कल्पना तायडे लाभल्या होत्या .
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या ” वक्तृत्वातील सप्तसुर म्हणजेच – सातत्य , रेटा, गती, मधाळ वाणी, परिश्रम, धीटपणा ,नियोजन व सराव – यांना आत्मसात करून तुम्ही उत्कृष्ट वक्ता होऊ शकता . ५ ते ७ च्या गटातून वर्गवार स्पर्धा घेण्यात आली. त्यातून उत्कृष्ट बोलणाऱ्या ९ विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरी करीता निवड करण्यात आली.
त्यासाठी त्यांना ‘आई संपावर गेली तर ….. किंवा ‘वृत्तपत्र माझा मित्र’ यापैकी एक विषय देण्यात आला होता. या विषयांवर आदित्य चतरकर, शुभंकर रेळे, मधुरा मल्हार , साविका इंगळे , शरयू चतरकर, मंजिरी देशमुख , आस्था बैस , मधुरा किडीले आणि वेदांती राऊत या विद्यार्थ्यांनी आपले भाषण केले. या स्पर्धकातून तीन उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करण्यात आली.
या स्पर्धकांना ‘भविष्यातील माझे स्वप्न ” हा विषय वेळेवर देण्यात आला. या विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले त्यामधून आदित्य चतरकर ची उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. अविनाश देव सरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. परिक्षक म्हणून प्रा. सौ. कल्पना तायडे व सौ. रश्मी जोशी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. विश्वनाथ गद्रे , कार्यकारिणी सदस्या अनघा देव, मुख्याध्यापिका किर्ती चोपडे , शाळा समिती सदस्य , पालकवर्ग , शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ मीना मुरूमकार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.