Come pick and speak
श्री शिवाजी विद्यालय अकोला येथे आयोजित स्वयंस्फूर्त ‘Come pick and speak’ या वक्तृत्व स्पर्धेत कु आस्था अभय अग्रवाल वर्ग ९ वा हिने ‘ My Aim in Life ‘या वेळेवर देण्यात आलेल्या विषयावर उत्कृष्टपणे आपले विचार मांडून प्रथम स्थान पटकाविले तर परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू येथे शिक्षण महर्षी स्व. बाबासहेब नाईक यांच्या स्मृतीनिमित्य आयोजित ‘औपचारिक शिक्षणानेच व्यक्ति सुसंस्कृत होतो का ? ‘ या विषयावरील वादविवाद स्पर्धेत विषयांच्या विरुद्ध बाजूस कु. साक्षी दिनेश दूतंडे हिने प्रभावीपणे आपले मत मांडून स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला .
तसेच तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातूर येथे स्व. सरलाबाई गहिलोत यांच्या स्मृतीनिमित्य आयोजित वक्तृत्व स्पर्धेत “Todays Indian Education System – Good or Bad ” या विषयावर Government या मुद्द्याच्या बाजूने बोलून कु . शैलजा प्रशांत लोहिया हिने सर्वोकृष्ट वक्तृत्व करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले . न्यूईरा कॉन्व्हेंट,अकोला येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्य आयोजित संस्कृत पाठांतर स्पर्धेत ‘अ’ गटातून अर्णवी राहुल महाशब्दे तर ‘ब ‘ गटातून वैष्णवी किशोर इंगळे या विद्यार्थिनींनी व्दितीय क्रमांक पटकावला.
या सर्व विदयार्थ्यांना रोख पारितोषिक , स्मृतिचिन्ह तसेच पुस्तके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री.दादासाहेब देव, सचिव प्रा.श्री. मोहन गद्रे सर, शाळा समिती सद्यस्य सौ. अनघा देव , तसेच सर्व शाळा समिती सद्यस्य, मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल, सौ.संगीता जळमकर, सौ.कीर्ती चोपडे, सौ.भारती कुळकर्णी तसेच सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.