राष्ट्रीय युवक दिन

स्थानिक बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय युवक दिन म्हणजेच विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाबाई जयंती उत्साहात सादर करण्यात आली.

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून वर्ग ९ वी चा विद्यार्थी यश खुमकर  होता. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षाचे  स्वागत साहिल देशमुख याने केले. सर्वप्रथम
राष्ट्रमाता जिजाबाई  यांच्या कार्यास साक्षी सारभूकन हिने आपल्या भाषणातून मानवंदना दिली. चैतन्य कुलकर्णी याने विवेकानंदाचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर विवेकानंदाचे शास्त्रावरील प्रभुत्व व समाजाप्रती योगदान आपल्या  भाषणातून हर्षदा पाटील हिने मांडले. गौरी सांबारे हिने आपल्या कवितेतून विवेकानंदांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षण प्रणालीत विवेकानंदाचे योगदान आपल्या भाषणातून गौरी मिसुरकर हिने मांडले. त्यांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या इंग्रजी भाषणातून वेदांत मारावार याने घेतला. विवेकानंदांच्या जीवनातील प्रसंग रोहन मसने याने

इंग्रजीतून व प्रणव खाडे याने मराठीतून गोष्टी रूपाने सांगितले.
यश खुमकर याने आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वावलंबन व युवापिढीचे राष्ट्रासाठी योगदान तसेच राष्ट्रमाता जिजाबाईची राष्ट्र बांधनीतील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष  श्री.अविनाश देव, सचिव श्री.गद्रे सर, शाळा समिती सद्यस्य श्री अजित पाटखेडकर व डॉ जयंत म्हैसने, शिक्षकवृंद, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.