‘नीलकंठ खाडीलकर’ पुरस्कार

नवाकाळ वृत्तपत्रातील अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर यांच्या नावाने दहावीत मराठी,संस्कृत आणि इंग्रजी या तीनही विषयात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला पुरस्कार दिला जातो.

यंदाच्या शालांत परीक्षेत हा मान अमरावती विभागीय मंडळातील बाल शिवाजी माध्यमिक शाळा जठार पेठ,अकोल्याच्या आरोही रामदास खोडकुंभे हिने प्राप्त केला आहे.

आरोहीने मराठीत ९९/१००,संस्कृतमध्ये १००/१०० आणि इंग्रजीत ९८/१०० गुण प्राप्त करून हा बहुमान मिळवला.एक लाख रुपये रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्यकर्मी कृष्णाजी खाडीलकर पारितोषिक,महाराष्ट्रातून मराठी या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला दिला जातो. यंदाचे वर्षी हे पारितोषिकही आरोहीच्या नावाने घोषित करण्यात आले आहे.

दहा हजार रुपये रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.तिने मिळवलेल्या या यशा बद्दल आरोहीचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षिका यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव श्री गद्रे सर, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल,सौ.कीर्ती चोपडे,सौ.संगीता जळमकर व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.