बाल शिवाजीची आनंदी बेले निबंध स्पर्धेत अव्वल
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी आनंदी विलास बेले हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.दिनांक २५-२६ नोव्हेंबर २०१७ रोजी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती,अकोला तर्फे ५ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्व.अंबरीश कविश्वर स्मृती प्रित्यर्थ ‘राज्यस्तरीय ग्रामगीता तत्वज्ञान निबंध स्पर्धेत’ बाल शिवाजी माध्यमिक शाळेची वर्ग ८ ची विद्यार्थिनी आनंदी विलास बेले हिने ‘अ गटातून’ प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
‘राष्ट्रसंत जीवन व कार्य’या विषयांतर्गत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या विषयावर तिने निबंध लिहिला होता. ३०००/- रोख,प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदीचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ.मंदाकिनी दांदळे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव श्री गद्रे सर, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल,सौ.कीर्ती चोपडे,सौ.संगीता जळमकर व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.