‘शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन’ आज ही मार्गदर्शक… प्रा. रमेश पाटील

 

जठारपेठ  येथील  बाल  शिवाजी  शाळेत  शिवजयंती उत्साहात  साजरी  करण्यात  आली. याप्रसंगी  व्यासपीठावर  शाळेचे  अध्यक्ष  अविनाश देव आणि प्रमुख पाहुणे  शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्रा. रमेशपाटील  हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन झाले. इयत्ता६वी च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, नाट्य,भाषण, कथाकथन, गोष्ट आदींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचा गौरव केला.

स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांचे आपत्ती व्यवस्थापन कसे होते हे देवेश वाखारकर व वरदा बिडवई यांनी    आपल्या विचारातून प्रगटकेले. अनिकेत पाटखेडकर यांने अफजलखान भेटीचा प्रसंग कथन केला तर King of Kindness ही गोष्ट हर्ष नाईक यांने सांगितली.  वर्ग ६ वीच्या विद्यार्थ्यांनी “आधी लग्न कोंढाण्याचे व मग रायबाचे” या प्रसंगाचे नाट्यीकरण सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. चैत्राली जोशी हिने केले.

याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील Famious   Four F – ‘ Find, Focus, Fight & finsh बद्दल माहिती देऊन  या तत्वांचा आज देखील आपण अवलंब केला पाहिजे असे मत इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. रमेश पाटील यांनी मांडले.  ‘शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाला शाळेचे सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या अनघा देव,शाळा समिती सदस्य, पालक, मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे , सौ. शोभा अग्रवाल , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ‘ एकात्मता मंत्राने’ झाली.