आमच्या बद्दल थोडेसे…!
विद्यालय हे एक मंदिर सुंदर प्रयाग जणू हे प्रज्ञेचे !
ज्ञानदिवाळी शोभा उजळी प्रसन्न गृह हे विद्येचे !!
RETROSPECT
The man of prudence and foresight –late Shri Annasaheb Deo, founder president of this alma mater viewed school as the very foundation of matured and well-developed personality. Hence he resolved to devote himself to the genuine and substantial development in the matrix of education. When on 1st July 1983 late Smt. Jankibai Palsokar handed over the responsibility of Balwadi to Annasaheb, he was attached to the field of education, in real sense.
Honourable late Annasaheb bid farewell to his profession as lawyer and completely devoted himself to nurture this sapling into full – bloomed evergreen tree.
Annasaheb was curious to know the reasons behind the failure of Marathi speaking candidates in the competitive examinations. He perceived the importance of cultivation, which should take place from the very childhood of an individual. Annasaheb was motivated to fulfill this stupendous task.
He chalked out the curriculum for the school within the frame-work of the government rules and regulations, of course the aim was to groom the students into ideal and worthy citizens with intelligence and impressive personality who could guide and lead the society towards progress. He never treated school as money minting machine. His ambition was to develop the students into confident and self-reliant individuals who could face any situation in life. To have individual attention number of students per section was kept limited. It was decided to appointed the lady teachers only, so that they could take care of the students with motherly warmth and tenderness.
Reading, thinking and meditation are the three aspects of personality development. The teachers are trained accordingly to guide the students in this respect. A school committee is formed to attain success in every field and to achieve aim. The committee members include parents as well as teachers. Parents meets are arranged to resolve the common problems of parents.
To acquire the recognition form government, Annasaheb had to strive hard. Eventually in 1988 he succeeded in getting recognition for primary section. And from that very moment his graph of success and progress is ever ascending.
In 1997-98 the school obtained the recognition for secondary school. On 7-02-1997 the institution survived a blow of sad demise of venerable Annasaheb. Since then Mr. Avinash Deo and Mrs. Anagha Deo shouldered the responsibility of the school.
Mr. Avinash Deo and Mrs. Anagha Deo tried to find out the shortcomings of the students and attempted to rectify them. The first step taken in this respect was the introduction of English speaking courses, the yearly-organized camps, encouraging the teachers to speak and express themselves in English etc. Secondly the students are motivated and encouraged to participate in inter-school competitions, science camps, Science queries etc. The result of this is the students have always kept the pennant flying. No wonder, the students of our School are topping the SSC results and 100% success for last so many years.
तीर्थक्षेत्राइतके पवित्र स्थान असणाऱ्या शाळेचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असते. मुलाना आपल्या आई बद्दल जेवढा जिव्हाळा असतो, तितकाच जिव्हाळा शाळेबद्दलही असतो. कारण संस्काररूपी बिजांचे रोपण घरा इतकेच शाळेच्या परिसरातही रुजते, फुलते आणि विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाने शाळेचीही कीर्ती सर्वदूर पसरते.
अकोल्यातील अनेक नामवंत शाळांमधून बेंचमार्क ने सन्मानित केलेली आमची बाल शिवाजी शाळा ही एक आदर्शाचा नमुनाच ठरली आहे .
आदर्शाप्रत पोहोचणे हे वाटते तितके सोपे नाही. इंग्रजी माध्यमाच्या, सी. बी. एस. ई. अभ्यासक्रमांच्या कित्येक शाळा पालकांना भुरळ घालत असतांनाही मराठी माध्यमांच्या आमच्या या शाळेची यशस्वी वाटचाल आजही अव्याहतपणे सुरु आहे. ही खरोखरीच अभिमानास्पद बाब आहे.
१ जुलै १९८५ रोजी कै अण्णासाहेब देव यांनी या ज्ञान यज्ञास सुरवात केली. उच्च विद्याविभूषित व काशी विद्यापिठात अध्ययन केलेल्या अण्णासाहेबांना मराठी माणसाची स्पर्धात्मक परीक्षेत पीछेहाट होत असल्याचे जाणवले. त्यामुळे अण्णासाहेबांनी विद्यार्थ्यांच्या विकासाकडे लक्ष देतांना आपल्या शिक्षण संस्थेत विविध उपक्रम राबविण्याचे ठरविले. व्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे हे ध्येय समोर ठेऊन तसे आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा निर्धार केला.
मराठीला राजभाषेचा दर्जा द्यायचा परंतु महाराष्ट्रात विनाअनुदानित खाजगी मराठी प्राथमिक शाळेला मात्र परवानगी द्यायची नाही. अशा विचित्र धोरणात्मक परिस्थितीत १९८४ साली संस्थाअध्यक्ष श्री अण्णासाहेब देव यांनी शासनाशी झगडून मराठी प्राथमिक शाळेला परवानगी मिळवली.
मर्यादित पटसंख्या, संस्कृत भाषा अनिवार्य, सर्व अध्यापक वर्ग शिक्षिकाच. अशी शाळेची मजबूत पाया उभारणी कै.अण्णासाहेब देव यांनी केली. श्री अण्णासाहेबांच्या निधनानंतर १९९७ साला पासून, बदलत्या काळाची गरज जाणून १ ली पासून सेमी इंग्रजी माध्यम, स्पर्धात्मक परीक्षेला महत्त्व व त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन, त्यासाठी अद्ययावत वाचनालय, सुसज्ज संगणक कक्ष , विज्ञान प्रयोगशाळा या सर्व सोयी उपलब्ध करून श्री. दादासाहेब देव व सौ. अनघा देव यांनी हा डोलारा समर्थपणे पेलला आहे.
आमच्या संस्थेत शालेय शिक्षणाबरोबर महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी बसावेत म्हणून त्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यासाठी विशेष मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. विद्यार्थ्याची कठोर मेहनत , संस्थेचे अचूक मार्गदर्शन, शिक्षकवृन्दांची डोळस ज्ञानवृत्ती आणि पालकांचा सक्रीय सहभाग यांच्या समन्वयातून आमचे विद्यार्थी अपेक्षित यश प्राप्त करीत आहेत.
विद्यार्थांच्या भावी जीवनात एस. एस. सी. परीक्षेला विशेष महत्व आहे. त्यांच्या भविष्यातील तो एक महत्वाचा टप्पा आहे. निकोप शैक्षणिक वातावरण , विद्याविभूषित प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शिक्षक पालक, आणि विद्यार्थी यांचा समन्वय टप्प्याटप्प्याने सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, या साठी अवांतर मार्गदर्शक पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, प्रत्येक सरावानंतर चुका निदर्शनास आणून देणे, आणि अधिकतम विद्यार्थी राज्यस्तरावर येतील याचा प्रयत्न करणे. शाळेचा १०० टक्के निकाल देणे हेच आमचे वैशिष्टय आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, समाजपरीस्थितीतील अनुचित प्रथांचा त्यांना खंबीरपणे मुकाबला करता यावा, सामाजिक परिस्थितीची जाणीव व्हावी तसेच तो सहसंवेदनशीलही व्हावा या उद्देशाने आमची संस्था प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते जसे स्नेहसंमेलन, संस्कृतदिन, विज्ञानदिन, थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळस्पर्धा, विज्ञान प्रकल्पाचे सादरीकरण, क्षेत्रभेटीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानदेणे त्यासाठी शैक्षणिक सहल अशा विविध उपक्रमाद्वारे विधार्थ्यांच्या बुद्धिमत्ता वाढीबरोबर व्यक्तिमत्व सुद्धा घडविल्या जाते.
प्रत्येक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांसाठी आणि दिवाळीपूर्वी पालकांकरिता पुस्तकांचे प्रदर्शन भरविल्या जाते .त्यांनी केलेल्या सूचनांचा काळजीपूर्वक विचार करण्यात येतो. पालकवाचनालयाचीही सुविधा आमच्या शाळेत उपलब्ध आहे. बालगटापासून ते दहावीच्या वर्गापर्यंत सर्वांनाच वाचनालयाचा तास अनिवार्य केलेला आहे. त्यासाठी शाळेचे समृद्ध ग्रंथालय कायम सेवेशी असते. निरनिराळ्या वाचन उपक्रमांद्वारे वाचन संस्कृती जोपासणे आणि वाढविणे या करिता शाळा कटिबद्ध आहे.
विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना विकसित करण्यासाठी उन्हाळ्यात विविध विषयांवरील शिबिरांचे आयोजन केले जाते. जिल्हा व राज्यस्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये व परीक्षामध्ये सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त आणि प्रोत्साहित केले जाते. त्यांना मिळालेल्या यशाचे भरभरून कौतुक केल्या जाते व पुरस्कारादाखल ग्रंथ भेट म्हणून दिले जातात. विधार्थ्यांच्या प्रगतीसाठी, पालकांशी समन्वय साधण्यासाठी पालक सभांचे आयोजन केले जाते व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात. दिलेल्या सूचनांचा सातत्याने विचार केला जातो.
विविध सामाजिक उपक्रमामध्ये स्वच्छता अभियान, वनवासी विद्यार्थ्याना मदत, अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत, असे समाजाभिमुख उपक्रम घेतल्या जातात.
संस्थेशी संलग्नित असलेल्या तानसेन संगीत विद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास, साहित्याबरोबर नृत्य आणि संगीताचेही शिक्षण दिल्या जाते.
मोजक्याच पण महत्वाच्या सुट्ट्या हे आमच्या शाळेचे खास वैशिष्टय, प्रज्ञावंत, गुणवंत, जिद्दी, आत्मनिर्भर, सामाजिक नैतिक जाणिवांचे भान ठेवणारे परिपूर्ण विद्यार्थी मराठी माध्यमाच्याही शाळेत तयार होतात. याचे प्रत्यक्ष उदाहरण असणारी, माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यस्तरावर सातत्याने यश संपादन करणारी आमची शाळा इतरांसाठी आदर्शाचा नमुना ठरली आहे. गत ४ वर्षापासून अमरावती बोर्डातून प्रथम आणि त्यापैकी ३ वर्षे महाराष्ट्रातून प्रथम येणारा विद्यार्थी घडविणारी अशी ही आमची शाळा…!