५१ व्या स्मृतिदिनी स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन – श्री.विवेक बिडवई
स्थानिक जठारपेठस्थित बाल शिवाजी शाळेत स्वा. सावरकर पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. विवेक बिडवई उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री व अकोला जिल्हयाचे पालकमंत्री मा. डॉ. रणजीत पाटील यांचा अमरावती पदवीधर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वर्ग ७ ची विद्यार्थिनी ख़ुशी नितीन मोहोड हिने सावरकरांना स्वातंत्र्याची शपथ घेण्याची प्रेरणा देणारी घटना विशद केली.वेदांत अनिल मोंढे याने सावरकरांचे कार्य इंग्रजी भाषणातून प्रस्तुत केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. विवेक बिडवई यांनी सावरकरांप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार वागण्या बोलण्यात देशाचाच विचार करावा व आपल्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करावी असा संदेश दिला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, शाळेचे सचिव श्री. मोहन गद्रे सर, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, शाळा समिती सदस्य,मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे,सौ.शोभा अग्रवाल,सौ.संगीता जळमकर,सौ. भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कीर्ती खपली यांनी तर संचालन कु. तन्वी उपाध्ये हिने केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् ने झाली.