आधुनिकतेशी मैत्री करावी…
दि. ५/२/२०१७ रोजी सावरकर सभागृहात स. १०.०० वा. माझी बाल शाळेचा आजी-आजोबामेळावा उत्साहात पार पडला . या मेळाव्याकरीता प्रमुख पाहुण्या म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा संगवई लाभल्या होत्या .
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. आंतरशालेय पाठांतर स्पर्धेत यशस्वी झालेल्या कु. स्वरा बोराखडे ,कस्तुरी देशपांडे व प्रणव नवले यांनी संस्कृत श्लोक सादर केले. तर कांचन कवडे हिने ‘भांडण आई बाबांचे ‘ ही नाट्य छटा उत्तमरीत्या सादर केली.
मेळाव्यात आजी-आजोबांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्मरणशक्ती स्पर्धेत आजोबांमधून डॉ. उमाकांत मेन व आजींमधून श्रीमती सुलोचना नवले यांचा प्रथम क्रमांक आला.
संगीत खुर्ची स्पर्धेत आजोबांमधून मधुकर धोत्रे व आजींमधून सौ. वर्षा देशपांडे प्रथम आले. एकमेकांना हार घालणे या स्पर्धेत श्री. तुकाराम गोमासे व सौ. आशालता गोमासे ही जोडी विजयी ठरली. तसेच प्रश्नावली चे उत्तम लेखन करणाऱ्या श्री. अरुण व सौ. अनुराधा जोशी आणि श्री. गुलाबराव व सौ. वंदना घुले या आजोबा आजींना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
या प्रसंगी आधुनिकतेशी मैत्री करून आणि नातवंडांशी संवाद साधून त्यांच्या प्रगतीचा हिस्सा व्हावे. असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या सौ. संगवई यांनी केले. तर संस्थेच्या अध्यक्ष श्री.अविनाश देव पालकांबरोबरच आजीआजोबांनी सुद्धा नातवंडांना सहकार्याची मात्रा द्यावी असे सांगितले . तसेच काही आजी-आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यकारिणी सदस्या सौ. अनाघ ताई देव, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अग्रवाल ,सौ. चोपडे, सौ. रेलकर व शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.भारती कुलकर्णी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन सौ. नयना जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. शेवटी सर्व आजी-आजोबांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.