प्लास्टिकचा अतिरेक टाळा आणि पर्यावरण वाचवा … श्री मिलिंद पगारे
प्लास्टिकचा अतिरेकी वापर वेळीच थांबवला नाही तर भविष्यात अतिशय गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाने अधिक जागरूक राहून प्लास्टिकचा वापर टाळा आणि स्वतःला आणि आपल्या पर्यावणाला वाचवा’ असे मत प्लास्टिक विरोधी चळवळ उभारणारे श्री मिलिंद पगारे यांनी स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत झालेल्या पर्यावरणपूरक कार्यक्रमात केले.
स्थानिक बाल शिवाजी शाळेत नववर्षानिमित्यआयोजित प्लास्टिक निर्मूलन चळवळ यशस्वी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यां मध्ये जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘निसर्ग कट्टा ‘ या पर्यावरण प्रेमी संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्लॅस्टिकचे दुष्परिणाम सांगून जागृती करणारे श्री मिलिंद पगारे , शाळेचे अध्यक्ष श्री अविनाश देव या वेळी उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलाने झाली.
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविकानंतर श्री मिलिंद पगारे यांनी विद्यर्थ्याशी संवाद साधला. आपल्या मार्गदर्शनात श्री पगारे यांनी प्लास्टिकचा उगम , त्याचा वापर , कचरा, पर्यावरण आणि आरोग्यावरील त्यांचे दुष्परिणाम, त्यापासून बचावाचे सोपे उपाय, इलेक्ट्रॉनिक कचरा , कचऱ्याचा औद्योगिक क्षेत्रात पुनर्वापर आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनातील कायदेशीर तरतुदी , कचरा व्यवस्थापनात उपलब्ध रोजगार संधी यावर चित्रफितीद्वारा माहिती दिली.
त्यानंतर निसर्गकट्टा या पर्यावरण प्रेमी संस्थेचे संस्थापक श्री अमोल सावंत यांनी प्लास्टिक विरोधी मोहिमेत सहभागी होऊन आपल्या पर्यावरणाला वाचवा ‘ असे आवाहन विध्यार्थाना केले . विद्यार्थ्यांनी या वेळी प्लास्टिक घरात येणार नाही याची ग्वाही दिली. त्यानंतर श्री पगारे यांना कार्यक्रमाची आठवण भेट म्हणून संस्थाध्यक्ष श्री अविनाश देव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.