बाल शिवाजीच्या बालवैज्ञानिकांची झेप
अकोला: मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ होमी भाभा ‘ बाल वैज्ञानिक व्हा ” या वर्ग ६ व ९ वी साठी घेतल्या जाणारया स्पर्धेत बाल शिवजी शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे .
या स्पर्धेत सहभागी झालेले वर्ग ६ चे विद्यार्थी आदित्य प्रकाश चतरकर, नमस्वी शेगोकार तसेच वर्ग ९ वी चे यशराज प्रमोद तायडे , ओम राजेश पाटील व अथर्व संजय तिडके या विद्यार्थ्याची निवड पुढील प्रात्येक्षिक परीक्षेकरिता झाली आहे. या विद्यार्थांची प्रत्येक्षिक परीक्षा पुणे येथे होणार आहे. ह्या स्पर्धेत तीन टप्प्यात निवड केली जाते .
पहिल्या फेरीत लेखी नंतर प्रत्येक्षिक परीक्षा होऊन त्यातील १० टक्के विद्यार्थ्याची मुलाखतीसाठी निवड केली जाते.
बाल शिवाजी शाळेचे अध्यक्ष श्री दादासाहेब देव , सचिव श्री गद्रे सर , शाळेच्या मुख्याधापिका सौ शोभा अग्रवाल , सौ चोपडे, सौ जळमकर सौ भारती कुलकर्णी , शिक्षक वृंद आणि शाळा समिती सदस्यांनी या विद्यार्थांचे कौतुक केले व पुढील परीक्षेकरिता शुभेछा दिल्या .