स्वच्छतेचा संदेश… निरोगी जीवनाचा संकल्प
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात
२५ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेत महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अश्विनी पाईकराव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार, कचरा व्यवस्थापन, ‘पाच आर’ आणि ‘कचऱ्याचा प्रवास’ याबाबत मार्गदर्शन केले. ओला-सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचरा कचरापेटीतच टाकणे, पुनर्वापर व पुनर्चक्रणाचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.
तसेच स्वच्छता, हात धुणे, अन्नाची नासाडी टाळणे, पाणी-विजेची बचत आणि परिसर स्वच्छ ठेवणे अशा चांगल्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
🌱 विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपक्रमाचा आनंद घेतला.
