🌟 बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे MTS परीक्षेत दैदिप्यमान यश! 🌟

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अंतर्गत वाडिया कॉलेज पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या वर्ग 8 ते 10 वीच्या 23 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे. असून करून विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनती, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले आहे.

वर्ग 8 वीची वसुंधरा प्रकाश रेवस्कर राज्यातून प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त केले असून  शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.  

     वर्ग 8 वी चे अर्णव रविंद्र भांबेरे व पियुषा राजेश भोंडे तसेच वर्ग 9 चे ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के हे विशेष पारितोषिकाचे मानकरी ठरले तर वर्ग आठवीचे अधिराज मंगेश मुरुमकार याला प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले.

     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.