बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याचे यश…..
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा जठारपेठ अकोला अंतर्गत वर्ग 9 वी चा विद्यार्थी आदित्य योगेश आवळे याने डाक विभागा तर्फे (Department of Posts) आयोजित करण्यात आलेल्या ‘Dhai Akhar’(ढाई अखर) या राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत आदित्यने विदर्भ विभागामधून प्रथम क्रमांक मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या वर्षी स्पर्धेचा विषय “ एक पत्र माझ्या आदर्श व्यक्तिमत्वाला” असा होता. या विषयावर आदित्यने प्रभावी, विचारपूर्ण आणि सुंदर हस्ताक्षरात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांना पत्र लिहून परीक्षकांची मने जिंकली. त्याच्या लेखनातील विचारांची मांडणी, भाषा आणि भावनिकता यांमुळे त्याला प्रथम क्रमांक मिळाला. त्याबद्दल त्याला रोख पारितोषिक २५०००/- व प्रमाणपत्र प्राप्त झाले.
आदित्यच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्याचे मनापासून कौतुक केले. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही लेखनाची प्रेरणा मिळेल, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
आदित्य योगेश आवळे याच्या या यशाबद्दल त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिका यांचे संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळा मुख्याध्यापिका संगीता जळमकर, तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळा यांच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
