डॉ. नितीन ओक आणि आर्यभट्ट खगोल मंडळातील खगोल प्रेमी विद्यार्थ्यांनी अनुभवली गुरु ग्रहाची जादुई दुनिया…

दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खगोल मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष खगोल निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रख्यात खगोल अभ्यासक डॉ. नितीन ओक यांच्या मार्गदर्शनात गुरु (Jupiter) ग्रह व त्याचे चार प्रमुख उपग्रह यांचे दुर्बिणीतून प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी मिळाली.

डॉ. नितीन ओक यांनी विद्यार्थ्यांना गुरु ग्रहाचा प्रचंड आकार, त्यावरील वादळी पट्टे, तसेच गॅलिलिओने शोधलेले आयो, युरोपा, गॅनिमीड आणि कॅलिस्टो या चार उपग्रहांची वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत या आकाश निरीक्षणाचा आनंद घेतला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व खगोलशास्त्राबद्दल कुतूहल आणि आवड अधिक वाढली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व आर्यभट्ट खगोल मंडळातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी शाळेच्या वतीने डॉ. नितीन ओक यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.