बाल शिवाजी शाळेत सखी सावित्री समिती अंतर्गत समुपदेशन कार्यशाळा

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत सखी सावित्री समितीच्या वतीने किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अकोल्याच्या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राधिका केळकर यांनी विद्यार्थ्यांना विचार, भावना व वर्तन यांचा परस्पर संबंध, मोबाईलचा दुरुपयोग व त्यावरील उपाय, ध्येय निर्धारण आणि आत्मशिस्त याबद्दल मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमाचे पालक व उपस्थितांकडून विशेष कौतुक झाले. 🌸