🌸✨ अथर्वशीर्ष पंच सहस्त्रवर्तन 🙏 ✨🌸
अकोला येथील बाल शिवाजी शाळेत ब्राह्मण सभा यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पंच सहस्त्रवर्तन उत्साहात पार पडले. 🎶
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, सचिव मोहन गद्रे व कीर्ती चोपडे यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी तन्मयतेने सामूहिक पठण केले.
शेवटी गणपतीची आरती व “गणपती बाप्पा मोरया” जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. 🙌✨
