पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक (इ.८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचा भक्कम यशाचा ठसा उमटला आहे. या परीक्षेत एकूण ४५ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती पात्रता प्राप्त केली आहे.
ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, इयत्ता पाचवीतील चिन्मय सचिन ताडे याने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे २४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीचे २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
तन्मय सचिन ताडे जिल्ह्यातून दुसरा, गार्गी पराग देशमुख जिल्ह्यातून पाचवी, अन्वया निलेश पाकदुने जिल्ह्यातून सहावी. अद्वैत प्रवीण गायकवाड, भार्गव शिवाजी देशमुख, अवनीश मुकेश निचळ, ओजस अमोल माडीवाले, अदिश मयूर देशमुख, कुशल विवेक चापके,वरुण रोहित चांडक, वरद संजय राऊत, आर्यही अभय मानकर, रिद्धी रितेश सांगळे, क्षितिजा प्रवीण जुमळे, शिवाई संजय धोत्रे, कृष्णा सत्यजित देशमुख, निष्ठा नितीन बंडावार, अदिश्री मंगेश सोळंके,ओवी अविनाश मेतकर, अनन्या माधव मुरूमकार, स्वराली प्रवीण दांदळे, शुभ्रा शरद इधोळ, देवश्री दत्तात्रय कराळे, अभिराम जयाशिष जोशी,
इयत्ता आठवीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
वेदश्री विशाल बकाल, राजस्वी नारायण शेगोकार, प्रणव सतीश नवले, आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर, ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के, लावण्या ललित वक्ते, रेवती रमण घोगरे, पूर्वा सतीश भातखडे, अनुजा राजेंद्र काशीद, आदित्य योगेश आवळे, टीना अनुप्रताप जयराज, पयोष्णी प्रसाद देशमुख, अर्श सचिन शिरभाते, ऋतुजा नंदकिशोर सोनोने, आर्यन गजानन जायभाये, आस्था श्रीकृष्ण धाये, ओवी सुरेश कातकडे, समृद्धी मनीष मगर, स्नेहल कैलास भाकरे, अदिती अजयराव देशमुख, शुभदा विवेक बीडवई.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी या उल्लेखनीय यशामागे असणाऱ्या सर्व शिक्षिका सौ. रागिणी आशिष बक्षी, सौ. अपर्णा मनोज बोरखडे, सौ प्रांजली वैभव जैन, सौ साक्षी संदीप सहस्रबुद्धे, सौ निलिमा चंद्रकांत चव्हाण, सौ. प्रिती दीपक निंबाळकर, सौ. अनिता प्रवीण वानखेडकर, सौ. शितल समीर थोडगे,सौ. रश्मी श्रीराम जोशी, सौ. वैशाली अजय पाटील, सौ. ज्योती विकास कोकाटे, सौ.ज्योत्स्ना बबनराव कानकिरड, सौ. श्रद्धा श्रीकांत रेलकर, सौ. अपेक्षा योगेश आवळे, सौ. निशा नरेश जोशी, सौ. रेणुका निखिल भाले, सौ. मीना मंगेश मुरूमकार, सौ. किरण अक्षय झटाले. सर्व विषय शिक्षिकांचे अभिनंदन केले. तसेच सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
