बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे…..

इयत्ता 8 वी तील अर्णव रवींद्र भांबेरे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत 100 पैकी 100 गुण मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला. इयत्ता 8 वी तील राजस्वी नारायण शेगोकार हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. तसेच ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के हिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद यांनी केले. असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.