बाल शिवाजी शाळेत स्व.अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न..

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव स्मृती पित्यर्थ इयत्ता 5 ते 7 साठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे यांनी केले. शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

यामध्ये एकूण 17 शाळांनी सहभाग घेतला होता ‘अमृतभाषा अभिजात मराठी’ या विषयावर विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी चार मिनिटे वेळ देण्यात आला होता. याकरिता माननीय श्री. मोहन खडसे सर व श्री. स्वप्नील इंगोले सर परीक्षक म्हणून लाभले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. सोयरा अतुल अंधारे प्रभात किड्स अकोला व दुसरा क्रमांक स्वरा राजेश मानेकर मोहरीदेवी खंडेलवाल स्कूल अकोला तर उत्तेजनार्थ कुमारी अन्वी अतुल बराटे बाल शिवाजी प्राथमिक शाळा अकोला. या विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त केली.

स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी वर्ग 5 वी चे अन्वया निलेश ताकदूने, अभिज्ञा राहुल इंगळे, ओजस अमोल माडीवाले. वर्ग 7 वीचे सई महेश राखे, अथर्व ज्ञानेश्वर तराळे, अन्वी अतुल बराटे यांना पुस्तक भेट देऊन यांचे याप्रसंगी कौतुक करण्यात आले. इतर भाषेशी निगडित असताना मायमराठीचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असे विचार याप्रसंगी परीक्षकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. वैशाली पाटील टीचर यांनी केले कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश देव ,सचिव माननिय श्री मोहन गद्रे ,कार्य कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.