बाल शिवाजी शाळेत शिक्षिका सक्षमीकरण कार्यशाळा……

दिनांक 22 /10/ 2024 मंगळवार रोजी स्व.अण्णासाहेब देव सभागृह येथे सकाळी 11 ते 12.30 या वेळेत वर्ग बालगट ते 10 वी पर्यंतच्या शिक्षीकांकरिता श्री. नरेंद्र देशपांडे सरांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सौ.भारती कुलकर्णी यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख अतिथीचा परिचय करून दिला. त्यानंतर श्री. नरेंद्र देशपांडे सरांनी मार्गदर्शनास सुरुवात केली. अध्ययन अध्यापन कार्य अधिक प्रभावी असण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल त्यांनी वेगवेगळी उदाहरणे सांगितले. विद्यार्थ्यांशी जवळीकता असावी, आपण जे काही शिकवितो ते थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समर्पक उत्तर द्यावे, शिक्षक असो की विद्यार्थी ऐकण्याची सवय असलीच पाहिजे, विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐका संवाद करा मर्यादित वेळ आहे, म्हणून तेवढेच असे करू नका. अद्ययावत  ज्ञान असणे गरजेचे आहे. संबंधित विषयांचे अवांतर वाचन करा दृष्टी ठेवून काम करा वेळेचे नियोजन करा. प्रत्येक शिक्षकाने अध्यापन प्रभावी करण्यासाठी कृतीयुक्त शिक्षण देणे आवश्यक आहे. काळानुसार शिक्षकाने अध्यापन पद्धतीत बदल करावेत विद्यार्थ्यांच्या मनात जागा निर्माण करावी तोच एक यशस्वी शिक्षक होय. अशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या कार्यकारणी सदस्या सौ. अनघाताई देव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व सौ. कीर्ती चोपडे तसेच शाळेच्या सर्व सहकारी शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या.