बाल शिवाजी शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…..
राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री सुहास उदापूरकर सर लाभले होते.. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनानी करणात आली. सर्वप्रथम कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती निष्ठा बंडावार हिने इंग्रजी भाषणातून सांगितली. तन्मय ताडे यांनी ‘भारतभूचे थोर सुपुत्र’ ही स्वरचित कविता सादर केली, तसेच अनुश्री चौखंडे हिने ‘धाडसी खंबीर व तत्त्वनिष्ठा ‘ दर्शवणारी लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी गोष्ट सांगितली यानंतर गांधीजी विषयीचा पोवाडा वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘मोहन ते महात्मा’ या प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केला कार्यक्रमाचे संचालन शाल्मली देशपांडे यांनी केले तर प्रास्ताविक व प्रांजली जैन यांनी केले कार्यक्रमातील प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना गांधीजींच्या अहिंसा व सत्य या मार्गाचा अवलंब वर्तनात करावा असे सांगितले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली. तसेच वर्ग ६ ते ९ च्या विद्यार्थ्यांनी चौका-चौकात तून स्वच्छतेचे महत्त्व घोषवाक्यद्वारे पटवून दिले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश देव, संस्थेचे सचिव मोहन गद्रे, शाळा समिती सदस्य समीर थोडगे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर. शिक्षिका, पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.