बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत बालसंसद निवडणुकीचे यशस्वी आयोजन

दिनांक ०७/०८/२०२४ रोजी नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या त्यामुळे निवडणुकीबद्दल मुलांच्या मनात कुतूहल होते शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची ओळख व्हावी या उद्देशाने जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत बाल संसद निवडणुकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
निवडणुकीचा प्रचार कसा करावा, बॅलेट पेपर कसा असतो, मतदान कक्ष,मतदार यादी,आचारसंहिता म्हणजे काय? प्रत्यक्ष मतदान कसे करायचे,ईव्हीएम मशीन वर मतदान कसे केले जाते या विषयीचे प्रात्यक्षिक दाखवून निवडणुकी विषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सकाळी नऊ ते 12:20 या वेळेत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या 496 विद्यार्थ्यांनी मतदान केले. बाल संसदेच्या निवडणुकीच्या रिंगणात 24 उमेदवार उभे होते. दुपारी 12:20 पर्यंत 93.83% बाल मतदात्यांनी मतदान केले.
शाळेच्या सर्व मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, शिक्षिका यांच्या सहकार्याने निवडणूक अतिशय शांततेने आणि शिस्तीत पार पडली.