बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्साहात संपन्न–

दिनांक 26/08/2024 रोजी शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वर्ग तिसरीच्या विद्यार्थिनी श्रावणी  नावकार व आनंदी कुलकर्णी यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या मा.शैलजा विजय अंधारे  यांचे स्वागत ओजस्वी देशमुख हिने पुष्प देऊन केले. सर्वप्रथम आज ‘गोकुळात रंग खेळतो हरी’ही गवळण सादर करण्यात आली. त्यानंतर पर्यावरण हा सजीवांसाठी अनमोल ठेवा असल्याने तो व्यवस्थित जतन करून ठेवणे गरजेचे आहे हा संदेश ‘इंद्रोत्सव बंद, गोवर्धनोत्सव सुरू’ या नाटिकेतून पटवून देण्यात आले. श्रीकृष्ण सुदामा यांच्या निस्वार्थ मैत्रीचे भाव आपल्या स्वगतातून कैवल्य चैतन्य कुलकर्णी याने  सादर केले तसेच ‘जसे कर्म तसे फळ ‘ही गोष्ट शिवांश आशुतोष गिरी या विद्यार्थ्याने सादर केली. सर्व विद्यार्थिनींनी ‘राधा ही बावरी’ या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. प्रमुख अतिथी मा. शैलजा अंधारे यांनी बोधपर कथेतून विद्यार्थ्यांची  दैनंदिन याचे मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा कलाविष्कार सादर केला. कार्यक्रमासाठी वर्ग शिक्षिका  रश्मी अग्रवाल , शुभांगी तिडके, सारिका सहारकर ,पर्यवेक्षिका रागिणी  बक्षी   नृत्य शिक्षिका तनुश्री भालेराव ,संगीत शिक्षिका सरोज जोशी यांचे मार्गदर्शन लाभले .कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला .या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश देव ,सचिव माननिय श्री मोहन गद्रे ,कार्य कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव,शाळा समिती सदस्य मा.श्री अमित पारवे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .कीर्ती चोपडे ,माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .संगीता जळमकर व शाळेतील शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता श्रीकृष्णाच्या नाम गजरात झाली .