दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी ब्राह्मण सभा अंतर्गत बालशिवाजी शाळेमध्ये संस्कृत दिन
संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा गाभा आहे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कुत भारती अकोला नगराच्या पत्राचार विभाग प्रमुख माननीय सौ. आर्यप्रभा काळे या लाभल्या होत्या. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सौ. रेणुका भाले यांनी प्रास्ताविक सादर केले त्यानंतर वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी समूहगीताद्वारे सरस्वती वंदना सादर केली प्रज्ञा भारती, श्री. भा. वर्णेकर यांचे जीवन कार्य भावेश पटेल यांनी आपल्या संस्कृत भाषणातून सादर केले. त्यानंतर प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगणारी संस्कृत नाटिका ‘महाराज: किं सुप्तवान्’ ही संस्कृत नाटिका सादर करण्यात आली. यामध्ये सहभागी शाळेत विविध संस्कृत स्पर्धा होते पार्थ रेचे, अनिश भाले, निलेश पाटील, सोहम बिडवई, वल्लरी रेलकर, आनंदी सरप, मृणाल पद्मने, पार्थ राऊत, आरोही महाशब्दे, सोनाक्षी दावेदार. संस्कृत दिनानिमित्त शाळेत संस्कृत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये पारितोषिक प्रदान करण्यात आली. पाठांतर स्पर्धेसाठी १ ते 2 वर्ग प्रज्ञावर्धन स्तोत्र, 3 ते 4 वर्ग शिवाष्टक स्तोत्र घेण्यात आले होते. व 5 ते 7 वर्ग मध्ये स्मरणशक्ती स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अनुक्रमे आदिनाथ सोमन शांभवी कुलकर्णी निहीर जोशी जानवी खरसाडे अवनी जोशी ओम शेकोकार हे विद्यार्थी यशस्वी झाले संस्कृत दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. पाठांतर स्पर्धेसाठी प्रज्ञावर्धन स्तोत्र शिवाष्टक स्तोत्र घेण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय सौ. आर्यप्रभा काळे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना संस्कृत भाषेचे महत्व आणि संस्कृती टिकवायची असेल तर संस्कृत शिवाय पर्याय नाही असा मोलाचा संदेश दिला. तसेच सौ. स्वाती बापट यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आस्था धाये हिने केले संपूर्ण कार्यक्रम संस्कृत मध्ये सादर करण्यात आला. वर्गा वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश देव शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व सौ कीर्ती चोपडे, शिक्षक वृंद उपस्थित होते.