बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनला शैक्षणिक भेट


इयत्ता आठवीच्या नागरिकशास्त्रांत विद्यार्थ्यांना कायदा  व  सुव्यवस्था या संबंधित पाठाच्या अनुषंगाने  ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे व्रत निष्ठेने जपणाऱ्या पोलिसांचे कार्य, पोलिस यंत्रणा, कामकाजाची पध्दत सर्वांची माहिती करून घेण्यासाठी स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनला शनिवार दि-09-03-24 ला  शैक्षणिक भेट दिली. 
पोलिस स्टेशनचे निरीक्षक मा .श्री अजित जाधव यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज कसे चालते, स्त्रियांच्या  सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा किती जागरूक असते, कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी कोणत्या नंबरवर मदत मागायची या बाबत माहिती दिली तसेच  कैद्यांची  मानसिकता बदलण्यासाठी पोलिस खात्यातर्फे चालवल्या जाणारे उपक्रम इ . माहिती दिली. वायरलेस यंत्रणा, कंट्रोल रुम बद्द‌लची माहिती वनिता धंदर व अर्चना चव्हाण यांनी दिली. सहाय्यक पोलिस अधिकारी श्री. किशोर आठवले यांनी FIR बद्दल  तसेच शस्त्रांचा वापर पोलिस केव्हा आणि कोणत्या कारणामुळे करतात याबद्दल  विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.  विद्यार्थ्यांनीकसे जागरूक रहावे याबद्दल सांगितले.  पार्थ राऊत याने पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल  स्वरचित कविता सादर केली. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस यंत्रणेबाबत, त्यांच्या कामकाजाची माहिती जाणून घेण्याची परवानगी देऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत केले यासाठी  शाळेच्यावतीने युगंधर पाकदुने याने आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाच्या प्रमुख सौ. मिना काळे होत्या. सौ. स्वाती बापट व सौ अपेक्षा आवळे यांनी त्यांना सहाय्य केले.      पोलिस खात्याला भेट देणारी अकोल्यातील पहिलीच शाळा असल्याचे श्री जाधव यांनी सांगून विद्याथ्यांचे कौतुक केले. मा ,आमदार श्री. रणधीर सावरकर यांनीही  सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनला भेट देऊन मुलांचे कौतुक केले.