येणाऱ्या संकटांना पाठ न फिरवता धैर्यानेसामना करावा व स्वामीजींचे व जिजाऊंचे प्रेरणादायी विचार आचरणात आणा. – सौ. वैशाली देशपांडे  

आज दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.  याप्रसंगी  प्रमुख अतिथी संस्थेच्या सहसचिव सौ. वैशाली देशपांडे ह्या लाभल्या होत्या.  कार्यक्रमाचे अध्यक्ष पद वर्ग ९ च्या समृद्धी काळंके हिने भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. किरण झटाले यांनी केले. सर्वप्रथम समर्थ मांडेकर याने कवितेतून जिजाऊंना वंदन केले. पायल शिंदे हिने इंग्रजी भाषेतून स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य व विचार मांडले. वेदांती जोशी हिने आपल्या मनोगतातून जिजाऊंची व्यक्तिरेखा उभी केली. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रसंग सोहम मोडक याने सांगितले. अध्यक्षीय भाषणातून समृद्धीने विवेकानंदांचे आदर्श व जिजाऊंचे विचार आपण अंगिकरायला हवे असा संदेश याप्रसंगी दिला. तर प्रमुख अतिथी सौ. वैशाली देशपांडे यांनी विद्यार्थी जीवनात 

येणाऱ्या संकटांना पाठ न फिरवता धैर्याने सामना करावा व स्वामीजींचे व जिजाऊंचे प्रेरणादायी विचार आचरणात आणा असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रणाली गावंडे हिने तर आभार प्रदर्शन समृद्धी मोकळकर हिने केले.   या कार्यक्रमास बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे,  सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.  एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.