बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहात संपन्न
‘ संस्कृत आणि विज्ञान विषयाची सांगड घालून संस्कृत भाषेचा वारसा जपावा ‘… मा. डॉ. सुचेता चिने
ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भिकमचंद खंडेलवाल महाविद्यालयातील शिक्षिका मा.डॉ. सुचेता चिने लाभल्या होत्या. भाषा जननी गीर्वाण भारती असलेल्या संस्कृत भाषेची श्रेष्ठता दर्शविणारा कार्यक्रम याप्रसंगी सादर करण्यात आला. मान्यवरांना हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर यांच्या हस्ते मान्यवरांना ‘वृक्ष भेट’ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकाद्वारे सौ.रश्मी जोशी यांनी महाकवी कालिदास आणि आधुनिक संस्कृत पंडित श्री. भा. वर्णेकर यांचे संस्कृत मधील योगदान विशद केले. संस्कृत दिनाच्या निमित्ताने पाठांतर स्पर्धा व कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. पाठांतर स्पर्धेत ‘अ’ गटासाठी ‘ कैवल्याअष्टकम ‘ घेण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांक चिरंतनी चव्हाण, द्वितीय क्रमांक आदिनाथ सोमण, ‘ब ‘ गटासाठी ‘ भगवदगीतेचा १२ अध्याय ‘ घेण्यात आला ‘ त्यामध्ये प्रथम क्रमांक देवश्री कराळे, द्वितीय क्रमांक वरद गंगाखेडकर’क’ गटासाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये वर्ग ५ वी तून वरदा कुळकर्णी, वर्ग ७ वी पूर्वा भातखडे हे विद्यार्थी यशस्वी झाले. वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘मम देशो भारतं मम भाषा संस्कृतम’ या भारत देशाचा आणि संस्कृत भाषेचा अभिमान आपल्या समूहगीतातून व्यक्त केला. परोपकाराचे महत्व सांगणारी ‘परोपकारार्थ इदं शरीरं ‘ ही संस्कृत नाटिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. या नाटिकेत गीत परळीकर, गार्गी गाडगीळ, अबीर गंगाखेडकर, नारायणी शास्त्री, समृध्दी काळंके, राघव बावणे, भार्गव महाकालीवार,सर्वज्ञ मशानकर, गिरीश निकम, आदित्य गाडगे, संचित यादव, दिपक देशमुख हे विद्यार्थी सहभागी होते तर सिंथेसायझर वर युगंधर पाकदुने व तबल्यावर कुणाल वराडे यांनी उत्तम साथ दिली. प्रमुख अतिथी डॉ. सुचेता चिने यांनी मार्गदर्शन करताना ‘ संस्कृत आणि विज्ञान विषयाची सांगड घालून संस्कृत भाषेचा वारसा जपावा. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर प्रत्येकाने बाळगावा’ असा मोलाचा संदेश दिला.
अतिथींचा परिचय सौ. अपर्णा बोरखडे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन सौ. स्वाती बापट यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग ८ वीची विद्यार्थिनी आनंदी सरप हिने केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे, शाळा समिती सदस्य श्री.निलेश पाकदुने ,
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग उपास्थित होते.