बाल शिवाजी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत ४३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर समृद्धी हरिश्चंद्र काळंके राज्यातून मेऱीट 

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे मार्च २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक ( इ.आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे एकूण ४३  विद्यार्थ्यांनी  राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय  गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले असून ते  शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.  वर्ग ८ वी च्या  समृद्धी हरिश्चंद्र काळंके  हिने जिल्ह्यातून १ ली तर राज्यातून ९ वी येण्याचा बहूमान मिळवला आहे. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत जिल्हास्तरावर इयत्ता ५ वी चे २५ विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी चे १८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत व शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.   

 पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत इयत्ता ५ वी तून जिल्हास्तरावर अधिराज मंगेश मुरुमकार (जिल्ह्यातून १ ला), अर्णव रविंद्र भांबेरे (जिल्ह्यातून २ रा) , स्वर्णाभ गुंजन लांडगे (जिल्ह्यातून ३ रा), श्रीजीत शंकर मोकळकर, जय संदीप पारसकर, ओम संतोष शेकोकार, वसुंधरा प्रकाश रेवस्कर, दिव्या कमलकिशोर चांडक, सोहम मंदार देशपांडे, आराध्या शरद धनी, अर्णव नंदकिशोर सोनोने, आराध्या सतिश सुळे, असित अमोल वानखडे, पियुषा राजेश भोंडे, आराध्या राहुल देशमुख, निर्मिती संतोष हाडोळे, अंशुमन धनंजय धोत्रे, भार्गव अरविंद मांडेकर, अनिरुद्ध अरविंद देशमुख, तनुश्री धनंजय चव्हाण, गौरी गजानन अनासने, मयंक अभय ताले, सायली विजय कुळकर्णी, ज्ञानदा संतोष ताले, आयुष राजाराम नजरधने या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.   

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी च्या जिल्हास्तरावर समृद्धी हरिश्चंद्र काळंके, अंजली अजय कराळे, अदिती गणेश तिहिले, स्वानंद विजय मोडक, समिक्षा विजय तराळे, ईश्वरी गणेश डांगे, रोहन राहुल शिरसाट, रेवा नितीन मुळे, पयोष्णी विक्रम घाईट, आदित्य मनोहर गाडगे, समृद्धी शंकर मोकळकर, देवांत देवेंद्र वाकचवरे, राजवीर राजेश तारापूरे, प्राजक्ता मिलिंद सांबारे, भक्ती अनिल कराळे, प्रांजल पराग गावंडे, रेवा राहुल अडगावकर, परिमल दिपक ठाकरे  या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.  
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव,शाळा समिती सदस्य,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगिता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.