तानसेन संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश
ब्राह्मण सभा अंतर्गत येणाऱ्या तानसेन संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मिरज तर्फे आयोजित शास्त्रीय संगीत परीक्षेत(सत्र २०२३) घवघवीत यश प्राप्त केले आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सर्व विद्यार्थी विशेष योग्यता प्रथम श्रेणीमध्ये पास झाले आहे. यामध्ये गायन प्रारंभिक परीक्षेत आर्या शेंडकर,अभिषेक खपली, जीविका रामटेके, अनुश्री चौखंडे, तनुश्री गव्हाळे, पद्मजा मराठे, कृष्णाई राऊत, पयोष्णी देशपांडे, वल्लरी रेलकर तसेच प्रवेश प्रथमप्रारंभिक परीक्षेत कल्याणी पांडे, परी गाडगे, रेवती घोगरे, श्रीयश पाठक तसेच तबला वादन प्रारंभिक परीक्षा सोहम बिडवई, ओजस बिडवई, देवांश तांबोळकर हे विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गायनाचे मार्गदर्शन सौ सरोज जोशी व तबला वादनाचे मार्गदर्शन श्री पुरुषोत्तम कोरान्ने यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश देव, सचिव प्रा. मोहन गद्रे, बाल शिवाजी प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व सर्व शिक्षिका व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.