इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेतील उत्तुंग यश

इतिहास शिक्षक महामंडळ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये बाल शिवाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे. ही परीक्षा वर्ग ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी  सुद्धा शाळेतील विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. यामध्ये वर्ग ६ ची ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के  ही  १०० पैकी ९९ गुण मिळवून राज्यातून प्रथम आली आहे तर वर्ग ७ वी ची सोनाक्षी मधुकर दावेदार हिने १०० पैकी ९३ गुण मिळवून राज्यातून तिसरी येण्याचा बहुमान पटकाविला आहे.  

सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती  सदस्य, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. तसेच शाळेतर्फेही या विद्यार्थिनींना बक्षिसे प्रदान करून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात आल्या.