” भारताने पुरातन काळापासून विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घातली आहे.  ” – मा.श्री. कुशल सेनाड  

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर मा. श्री. कुशल सेनाड  (HOD Science and Technology wing, श्री. चिमणलालजी भरतीया विद्यालय,अकोला), ब्राहमण सभा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे , कार्यकारिणी सदस्य मा. सौ. वैजयंती पाठक,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर उपस्थित होत्या.  डॉ. सी व्ही रमण व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.  मा. श्री. कुशल  सेनाड यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त माध्यमिक शाळेच्या शिक्षिका सौ. अंजली शेटे यांनी मराठी साहित्याची ओळख आपल्या प्रास्ताविकातून मांडली. योगिनी निकम हिने आपल्या भाषणातून मराठी भाषेची महती कथन केली. गार्गी गाडगीळ  हिने आपल्या भाषणातून डॉ. सी व्ही रमण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्राप्ती पवार ने ‘ मिसाईल वुमन ‘  डॉ. टेसी थॉमस यांच्याबद्दल माहिती सांगितली.  

राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त बाल शिवाजी माध्यमिक शाळेतर्फे’ Do it yourself ‘ , ‘ Perform and Analyse ‘  ही आंतरशालेय विज्ञान स्पर्धा २१ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्ग ८ ते १० विद्यार्थ्यांसाठी  आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेमध्ये कोठारी कॉन्व्हेंट च्या श्रुती आहुजा, राहुल राठी, क्षिप्रा मौर्य या गटाने प्रथम क्रमांकाचे १०००/ रु. चे रोख पारितोषिक पटकावले तर SOS चे निशांत देशमुख, नंदन गावंडे, आयुष जाधव गटाचा व्दितीय क्रमांक आला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जागृती विद्यालयाच्या अरहंत तायडे, ऋतुजा जुमळे, आर्या कोतेगावकर यांनी प्राप्त केले. विशेष म्हणजे केवळ ज्ञान वृद्धीच्या हेतूने बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या ऋतुराज कातखेडे, राघवेंद्र देशमुख, कुणाल वराडे  या विद्यार्थ्यांचा गट स्पर्धेत सहभागी झाला होता. या गटाने उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यासाठी  बाल शिवाजी माध्यमिक शाळेतर्फे   १०००/ रु. चे रोख पारितोषिक देऊन या गटाचे कौतुक करण्यात आले.  Inter School Science Funfair  ही स्पर्धा वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेमध्ये वर्ग ५ वी साठी जीवशास्त्र विषयावरील chart presentation तर वर्ग ६ वी साठी भौतिकशास्त्रावर आधारीत Working Model Presentation व वर्ग ७ वी साठी रसायनशास्त्रावर आधारीत प्रयोग सादर करण्यात आले . शहरातील विविध शाळा या  स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत प्रभात किड्सच्या अनुक्रमे वर्ग ५, ६, ७ मधून अक्षय तळोकार, अनय बाचोका आणि आर्या  राठी यांनी  प्रथम क्रमांक पटकावला. विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या वर्ग ५ मधून शंतनू खडसे याने  द्वितीय क्रमांक प्राप्त केला . कोठारी कॉन्व्हेंट च्या वर्ग ६ च्या अथर्व बाहेती व वर्ग ७ ची निशी मेर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला . बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या वर्ग ५ चा अधिराज मुरुमकार, वर्ग ६ चा आर्यन जायभाये,  वर्ग ७ ची रेवती कुकडे हे विद्यार्थी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेचे परीक्षण मा. सौ. वैजयंती पाठक व संजीवनी चिंचोळकर यांनी केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. याप्रसंगी  

” भारताने पुरातन काळापासून विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घातली आहे. विद्यार्थ्यांना आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे विज्ञानाच्या मदतीने पारखता यायला हवे ” असे मत प्रमुख अतिथी मा. श्री. कुशल सेनाड यांनी मांडले.  प्रमुख अतिथीना संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ. अंजली शेटे  यांनी केले. तसेच मराठी राजभाषा दिन निमित्त वर्ग १ ते ४ चे शाब्दिक खेळ, चित्रप्रदर्शनी, मराठी पाट्यांचे खेळ, कविता वाचन, चित्र वर्णन इ. स्पर्धा घेण्यात आल्या. वर्ग ५ ते ९ साठी जास्तीत जास्त म्हणी सादरीकरण,चित्रवर्णन,  कथापूर्ती करणे ‘लेखन स्पर्धा अभिवाचन स्पर्धा इ. घेण्यात येऊन विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलीत. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वर्ग १ ते ४ साठी विज्ञान खेळणी व प्रदर्शनी  chart  and model  Presentation,  वर्ग ३ री साठी विज्ञान प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये तन्मय सचिन ताडे, कुशल विवेक चापके या चमूने प्रथम क्रमांक प्राप्त केला.  वर्ग १व २ री च्या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून seed balls चे वितरण केले.  सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे  कौतुक संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, संस्थेचे सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघा देव, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर,  बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, सर्व शिक्षिका, कर्मचारी यांनी केले आहे.